August 15, 2025 1:19 pm

विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना गुरुकुंज आश्रम मोझरी येथील स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ. सोबत जितेंद्रनाथ महाराज, जनार्दनपंत बोथे गुरुजी, डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्ञानेश्वर रक्षक व इतर. अन्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धक

गुरुकुंज आश्रम मोझरी येथील ‘स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ’ महाविजेता

का टा वृत्तसेवा 
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप गुरुवारी झाला. या स्पर्धेत गुरुकुंज आश्रम मोड़झरी येथील स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ प्रथम क्रमांक पटकावीत महाविजेता ठरले. या मंडळाला एक लाख रुपयांचा पुरस्कार, मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
                           कविवर्य सुरेश सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत काळमेघ, प्रा. अनिल सोले, ज्ञानेश्वर रक्षक, अशोक यावले, नानाभाऊ ढगे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा निकाल असा आहे

प्रथम क्रमांक – स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी (१ लाख रुपये)
दुसरा क्रमांक – आदर्श गुरुदेव सेवा मंडळ, निमगव्हाण, चांदूर रेल्वे (७१ हजार रुपये)
तिसरा क्रमांक – सार्थक गुरुदेव सेवा मंडळ, हस्तापूर, बाभुळगाव (५१ हजार रूपये) 
चौथा क्रमांक – गुरुदेव मानवसेवा छात्रालय भजन मंडळ, मोझरी (४१ हजार रुपये)
पाचवा क्रमांक – अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, हिरापूर, बौथली, चंद्रपूर (३१ हजार रुपये)
सहावा क्रमांक – जय वळेकर माउली भजन मंडळ, खामगाव (२१ हजार रुपये)
सातवा क्रमांक – गुरुमाऊली भजन मंडळ साहूर, आष्टी (११ हजार रुपये)
उत्तेजनार्थ पुरस्कार : गोपाल प्रासादिक मंडळ साकोली, नक्षत्र कलामंदिर नागपूर, गुरुमाऊली भजन मंडळ नागपूर, गुरुदेव भजन मंडळ नागपूर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गिरड, रत्नाक्षी भजन मंडळ नागपूर, नवयुवक भजन मंडळ कळमेश्वर, गुरुदेव सेवा भजन मंडळ जयताळा – नागपूर, गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ, नवे बीडीपेठ नागपूर, गुरुदेव सेवा भजन मंडळ- अर्जुनी मोरगाव, गुरुदेव बाल सेवा मंडळ समुद्रपूर, गिरड, ग्रामनाथ सेवा भजन मंडळ राळेगाव, जय बजरंग गुरुदेव भजन मंडळ – दहेगाव रंगारी आणि साईकृपा भजन मंडळ म्हाळगीनगर, नागपूर यांना ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News