जीवनात कर्तव्यदक्ष असणे गरजेचे : ज्ञानेश्वर रक्षक
झिंगाबाई टाकळीत रंगला अनोखा सेवापूर्ती प्रबोधन सोहळा
नागपूर : नागपूर: श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, सप्तखंजरी वादक व गुणवंत कामगार पुरस्कार विजेते, मोहनदास चोरे नुकतेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतून प्रधान यंत्रचालक पदावरून निवृत्त झाले. यानिमित्त झिंगाबाई टाकळी येथील अंजनादेवी सभागृहात सेवापूर्ती सोहळयाचे आयोजनकरण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, तर अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सप्तखंजरीवादक यांनी मोहनदास चोरे यांच्यातील कर्तव्यदक्ष व्यक्तीत्वाच्या आठवणींना उजाळा देत जवळपास प्रबोधनंच् केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर रक्षक यांनी ‘मानवी जीवनात किमान आर्थिक स्वायत्तता महत्वाची आहेच, पण ती संत तुकारामाच्या भाषेत ‘जोडोनीया धन उत्तम व्यवहारे’ अशी असायला हवी असल्याचे सांगितले. तसेच आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य इमाने इतबारे निभावने यातच खरा परमार्थ सामावलेला असल्याचे रक्षक यांनी विषद केले.
मोहनदास चोरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दातील खरं माणूसपण जगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साथीला पत्नी म्हणून हिम्मतीने साथ देणारी मीरा त्यांना मीळाली, त्यामुळे संसार, परमार्थ त्यांना साधता आला. मान्यवरांनी मनोगतात मोहनदास यांच्या प्रामाणिक व निःस्वार्थ सामाजिक सेवेचे कौतुक करून आयुष्यातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पारेषण व महानिर्मितीतील संघटनेचे तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने पाटील, माजी नगरसेविका संगीता गिर्हे, दीनबंधू सेवा संस्थेचे नितीन सरदार, राष्ट्रीय कीर्तनकार दिनकर चोरे, वर्धमाननगर वीज वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता पराग मुपिडवार उपस्थित होते. युनियनचे राज्य सचिव प्रकाश निकम व आकाश टाले यांनी संचालन केले.

