भावाने बहिणीला लॉजवर मित्राबरोबर पकडला
बहिणीची खिडकीतून उडी, तर मित्राला भावाने चाकूने भोसकले
का टा वृत्तसेवा :
नांदेड : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घडलेल्या धक्कादायक प्रसंगामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी मित्रांबरोबर तामसा रोडवरील एका लाॅजवर गेल्या होत्या.
त्यापैकी एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेली असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच भाऊही आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहोचला. बहिणीला एका तरुणा बरोबर खोलीत पाहताच भावाचा संताप अनावर झाला आणि त्याने त्या ठिकाणीच वाद घातला. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे.
भावाला खोलीत आलेले पाहून घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावर उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिच्या हाताला जबर दुखापत झाली असून तो फ्रॅक्चर झाला. दरम्यान भावाने व त्याच्या मित्रांनी बहिणीच्या मित्राला लॉज मधून बाहेर ओढत भोकर फाट्या नजीक नेले. त्यिाला मारहाण करत त्याच्या पोटात चाकू खूपसून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या मित्रावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या सर्व प्रकारानंतर तीनही तरुणींनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळे वळन लागले आहे. पिडीत तरुणीने पोलीसात तक्रार देत सांगितले की, तीन तरुणांनी त्यांना बळजबरीने लाॅजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तसेच जातीवाचक शिवीगाळ करत लॉजवर नेल्याचे तरुणींनी सांगितले. या तक्रारीवरून तीन तरुणांविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या बाजूला ज्या तरुणाला भोसकण्यात आले, त्याच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नांदेड ते पोलीस अधीक्षक अभीनाश कुमार यांनी दिली.. दोन्ही गुन्हयांचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सदर प्रकरणातील घटनाक्रमाने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.