कळमेश्वर : तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 23 जुलैला स्थानिक निशादत्त सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख, भाजपा नागपूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, कळमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, धनराज देवके, कळमेश्वर शहराध्यक्ष प्रतीक कोल्हे, प्रकाश वरुळकर, महादेव इखार, विलास गणोरकर, निळकंठ तपासे, स्वप्निल चौधरी, वैभव टेकाडे, मंगेश चैरे, संयोजक मुकेश भरके, प्रवीण काथवटे, सचिन रघुवंशी, रशीद शेख, प्रगती मंडल, मनीषा लंगडे, नीलिमा धनगरे, रूपाली चुनारकर, कांचन आंबुलकर इ. उपस्थित होते.
शिबिरामध्ये तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे यशस्वीतेसाठी अभिषेक धोटे, पवन झाडे, वैभव मानकर., आदित्य जिचकार, हर्षल गिरडे, जय हत्ती,. रोहित बागडे इ. नी सहकार्य केले. शिबिरात रक्तसंकलनासाठी ‘रेनबो ब्लड बँक, नागपूर’ चे सहकार्य लाभले.