Contact Us
वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, न्युज पोर्टल, युटयुब चॅनेल व चित्रवाहिन्यांचे समाजजीवनात महत्त्व अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वृत्तपत्रांसहित सर्व माध्यमे केवळ बातम्या आणि माहिती पुरविणेच नाही, तर ती समाजाची मुलभूत गरजा अन्न, पाणी, वीज, वस्त्र, आरोग्य, शिक्षण, निवारा, संस्कृती आणि समाजातील व राजकारणातील स्थिती सुद्धा प्रतिबिंबित करतात. ही सर्व माघ्यमे समाजातील विविध घडामोडींचा त्वरित पुरवठा करतात. त्यामुळे नागरिकांना समाजातील घडामोडींची माहिती मिळते आणि त्यावर योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
‘‘कामगार टाइम्स’’ हे नागरिकांच्या सर्वांगिण जागृतीसाठी वाहिलेले साप्ताहिक असुन ूूूणंउहंतजपउमेण्बवउ हे ‘‘कामगार टाइम्स’’ चे वेब न्यूज पोर्टल आहे. याव्दारे समाजात जागरूकता निर्माण करण्यासोबतच ते समाजातील विविध समस्यांची, शोषणाची आणि अन्यायाची दखल घेऊन त्यावर जनसामांन्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्या जातो. यामुळे लोकांमध्ये सामाजिक मुद्यांविषयी जागरूकता वाढते. जे सर्वच् प्रसार माध्यमांचे मुलभूत कर्तव्य आहे. याव्दारे सरकार आणि प्रशासकीय धोरणांवर तक्रारी, टिप्पण्या, समर्थन किंवा विरोध करतात. त्यांचे विश्लेषन आणि लेख लोकांमध्ये सरकारच्या कार्यप्रणालीसंबंधी जागरूकता निर्माण करण्यासोबतच् शासन आणि प्रशासनाच्या धोरण व कार्यप्रणालीला जनहितार्थ प्रभावित करतात. केवळ माहितीच पुरऊन नाही, तर ते लोकांच्या ज्ञानवृद्धीसाठी शिक्षणात्मक लेख, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि कला यांच्या संदर्भातील लेख प्रकाशित करून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘‘कामगार टाइम्स’’ कटीबद्ध आहे.
संस्कृतीचे संवर्धन: समाजाच्या विविध संस्कृती, परंपरा, आणि भाषांचे संवर्धन करण्यासोबतच या माध्यमातून लोकांना संस्कृती, धर्म आणि जीवनशैलीविषयी माहिती मिळण्यात निश्चितच मोठी मदत होईल. लोकशाहीत मोलाची भूमिका बजावण्यासह व्यक्तिस्वार्तंत्र्य, लोकशाहीचे मूलभूत अधिकार आणि न्यायव्यवस्था याबद्दल माहिती देण्यासोबतच लोकशाहीचे रक्षण व देशनिर्माणासाठी ‘‘कामगार टाइम्स’’ प्रतिबद्ध आहे. ‘‘कामगार टाइम्स’’ केवळ माहिती पुरवणारे साधन नाहीत, तर ते समाजाच्या प्रत्येक अंगावर प्रभाव टाकणारे एक महत्वाचे माध्यम आहेत. वाचक व जाहिरातदारांनी ‘‘कामगार टाइम्स’’ वर भरभरून प्रेम आणि समर्थन केलं आहे. भविष्यात असाच स्नेह कायम असू द्यावा. धन्यवाद!
महेंद्र शेंडे
संपादक व प्रकाशक
कामगार टाइम्स