मोटरसायकलला लटकवलेल्या पिशवीतून 1.42 लाख रुपये लंपास
वरुड येथे दिवसाढवळ्या चोरी
का टा वृत्तसेवा I संदिप माळोदे
अमरावती (वरुड) : येथील शिव ट्रेडर्स जवळून मोटर सायकलला लटकवून ठेवलेली १.४२ लाख रुपयांची कापडी पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी दोन आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. वरुड पोलीस स्टेशनला नारायण हरिसिंग बघेल (रा. एकदरा, वय ६४वर्ष) यांनी तक्रार नोंदवली. त्याआधारे दोघांचाही शोध घेतला जात आहे.
शेतकरी व किराणा व्यावसायिक असलेले हरिसिंग बघेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या मुलाचे एकदरा येथे सेंट्रल बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. त्या व्यवहाराकरिता सेंट्रल बँकेच्या वरूड शाखेतून त्यांनी २ लाख रुपये काढले. त्यातील ८० हजार रुपये नागपूर नागरी बँकेच्या कर्ज खात्यात भरले, तर १३ हजार रुपये सचिन एजन्सी वरुड यांना दिले. त्यामुळे त्यांच्याकडे १ लाख ७ हजार रुपये उरले होते. या रकमेशिवाय फिर्यादी जवळ स्वत:चे ३५ हजार रुपये होते.अशाप्रकारे १ लाख ४२ हजार रुपयांची ही रक्कम त्यांनी हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एम एच २७ सी एल ८७८१) मोटर सायकलला कापडी पिशवीत लटकवली होती.
दरम्यान रिंग रोडवरील शिव ट्रेडर्स येथे सायंकाळी ५.३० ते ५.४५ दरम्यान ते किराणा घेण्याकरिता थांबले. यावेळी मोटर सायकलची कापडी पिशवी सोबत घ्यायला ते विसरले. नेमकी हीच संधी साधून अज्ञात आरोपीने मोटरसायकलच्या हँडलला लटकलेली पिशवी पळवली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सरोदे, पोलीस उपनिरीक्षक काळे, डीबी स्कॉडचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक राजू मांडवी, सचिन भगत, चंद्रकांत केंद्रे आदी आरोपीचा शोध घेत पुढील तपास करीत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क (वरूड शहर व तालूका, जि. अमरावती)
श्री. संदिप माळोदे, मो. नं. 9561165380