August 15, 2025 3:05 am

Gang Rape : कोलकात्यात कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

आरोपींमध्ये पिडीतेच्या काॅलेजचे दोन, तर एका माजी विद्यार्थ्यांचा समावेश

तीन्ही आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी

का टा वृत्तसेवा : न्युज रूम

कोलकाता  (२७ जून) :  कोलकाता येथील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती. शुक्रवारी सकाळी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना २५ जून रोजी घडली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा गुन्हा तळमजल्यावरील एका गार्ड रूममध्ये करण्यात आला. विद्यार्थी संघटनेचे कार्यालयही त्याच्या शेजारी आहे. आरोपींमध्ये मनोजित मिश्रा, जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन विद्यमान विद्यार्थी आणि एका माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
                        बुधवारी संध्याकाळी ७.३० ते ८.५० च्या दरम्यान कॅम्पसमधील एका खोलीत सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी प्रथम तिला कॉलेजमध्येच राहण्यास सांगितले. त्यानंतर, ते तिला तळमजल्यावरील एका खोलीत घेऊन गेले. तेथे आरोपींनी रात्री १० वाजेपर्यंत तिच्यावर बलात्कार केला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, सामूहिक बलात्कारादरम्यान रेकॉर्डिंग देखील करण्यात आले होते. नंतर त्यांनी धमकी दिली की जर तिने या घटनेबद्दल वाच्यता केली तर ते व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केले जातील.
तीन दिवसांत कारवाई संदर्भातील अहवाल द्याः राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर
                        राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना तीन दिवसांत कारवाई संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहन गंभीर चिंता व्यक्त केली आणि बीएनएसएसच्या कलमांखाली तत्काळ चौकशीचे निर्देश दिले. त्यांनी पीडितेला वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत देण्याबरोबरच भरपाई देण्याची गरज असल्यावर भर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News