August 15, 2025 7:36 am

The son killed his father with an axe : मुलानेच कुऱ्हाडीने वार करून वडिलांना संपविले

मुलानेच कुऱ्हाडीने वार करून आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केली

वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील घटना; पोलिसांनी केली आरोपीला अटक

का टा वृत्तसेवा I
चंद्रपूर (वरोरा) : वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथे माणुसकीला हादरवून टाकणारी एक घटना घडली. मुलाने कुऱ्हाडीने वार करून आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. गुलाब पत्रूजी दातारकर (५८) असे मृत वडिलाचे नाव आहे, तर अभय गुलाब दातारकर (३४) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
                         १९ जुलै रोजी सकाळी मृत गुलाब दातारकर आपल्या पत्नीसह घरी होते. त्याचवेळी आरोपी अभयने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि वडिलांवर कुन्हाडीने हल्ला केला. दरवाजा बंद असल्याने गुलाब दांतारकर यांच्या मदतीला कोणीही धावून जाऊ शकले नाही. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
                          पोलिसांनी आरोपी अभय दातारकरला ताब्यात घेऊन वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. वडिलांनी शेतीची विभागणी करून दोन्ही मुलांना वाटप केली होती. मात्र व्यसनाधीन असलेल्या अभयने आपला वाटा विकून टाकला असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे वडील आणि मुलामध्ये वाद झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच अभयची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याच्यावर औषधोपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळली आहे.
                           या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर घोटेकर, पोलीस उपनिरीक्षक सुमीत कांबळे, मदन येरणे, निखिल कौगरासे, छगन जांभुळे, दिनेश ताटेवार, पोलीस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर आणि प्रगती भगत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News