अनियंत्रीत स्प्लेंडर मोटरसायकल अपघातात मामा ठार, तर भाचा गंभीर जखमी

काटोलवरून कळमेश्वरला येतांना गाडीचा तोल जावुन अपघात

का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
कळमेश्वर : येथुन 3 कि.मी. वर उत्तरेस घोराड येथे आज दि. 26 मे ला दुपारी 12.30 ते 01.30 चे दरम्यान दुचाकी क्रं. एम. एच – 40, सि.ई – 4124 चा अपघात होउन मागे बसलेला इसम सुधाकर नेवारे वय 53 वर्षे चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चालक मृतकाचा भाचा सुरज मधुकर राऊत वय 36 वर्ष रा. वार्ड क्र 1, कळमेश्वर हा गंभीररीत्या जखमी असून त्याचेवर नागपूर मेडीकल काॅलेज येथे उपचार सुरू आहेत.
पो. स्टे. कळमेश्वर येथून प्राप्त माहितीनुसार काल दि. 25/05/2025 रोजी रात्री 8.30 वा. सुमारास मृतक सुधाकर नेवारे हे मागे बसुन डबलसीट काटोल येथे मयतीला गेले होते. मयत झाल्यावर दोघेही काटोलाच थांबले. आज दुपारी 12/30 वा. स्प्लेंडर कंपणीची दुचाकी क्रं. एम. एच – 40, सि.ई. – 4124 काटोलवरून कळमेश्वरला येतांना याच्या गाडीचा तोल जावुन नाल्यात पडल्यामुळे अपघात होवुन अपघातामध्ये सुधाकर नेवारे यांचा मृत्यू झाला असुन सुरज राऊत जखमी आहे.
                       सदर अपघात होवुन सुधाकर नेवारे यांचे मरणास वाहन चालक नामे सुरज राऊत हा कारणीभुत असल्याने कळमेश्वर पोलीसांनी अप क्र. /2025 वर कलम 281, 106, 125 (अ) बी.एन.एस -2023 सह क. 184 मोवाका नुसार फिर्यादी – मृतकाचा चुलत जावई राहुल रमेश सावनेरकर, वय 35 वर्ष रा. कळमेश्वर याचे तोंडी तक्रारीवरून घटनेची नोंद घेउन पुढील तपास कळमेश्वर पोलीस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News