February 7, 2026 2:43 pm

अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 39 जणांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीदरम्यान दुर्घटना

स्वतःच्या रॅलीला उशिरा पोहोचला, अपघातानंतर थेट चेन्नईला गेला

वृत्तसंस्था,
करूर (तामिळनाडू) : २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी तामिळनाडूतील करूर येथे सुपरस्टार आणि तमिळग वेट्री कळघमचे (टीव्हीके) नेते विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ३9 जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत १६ महिला आणि १० मुलांसह ३९ जणांचा मृत्यू झाला. ९५ जण जखमी झाले, तर ५१ जण आयसीयूमध्ये आहेत. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. तमिळनाडूतील करूर येथे ही घटना घडली. रॅलीच्या ठिकाणी अनेक जण बेशुद्ध पडले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

                         अभिनेता विजय तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या प्रचार रॅली घेत आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांची रॅली करूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यास हजारो चाहते उपस्थित होते. सुरुवातीच्या माहितीनुसार तीस हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्याआधी विजय यांची नमक्कल येथे सभा झाली. विजय यांना करूर येथे पोहोचण्यास सहा तास उशीर झाला. रॅलीमध्ये १०,००० लोकांसाठी परवानगी होती, परंतु ५०,००० लोकांचा जमाव जमला होता. विजयला रॅलीमध्ये एक ९ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आणि त्याने मदतीसाठी आवाहन केले, ज्यामुळे त्या दरम्यान प्रचंड गर्दीने चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रह्मणियन यांनीही रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमत्री एम. के. स्टॅलिन यांनी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

                         गेल्या महिन्यांत त्रिची येथे झालेल्या सभेतही अशीच प्रचंड गर्दी झाली होती. २० मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी सहा तास लागले होते. त्यामुळे पोलिसांनी विजय यांच्या सभेला अटी घातल्या होत्या. त्यानुसार विजय यांच्या ताफ्यात कोणीही सहभागी होणार नाही, गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि दिव्यांगांनी ऑनलाइन रॅली पाहावी, अशी सूचना पोलिसांनी केल्या होत्या. मद्रास उच्च न्यायालयानेही विजयच्या रॅलीतील गर्दीच्या सुरक्षितेवर निरीक्षण नोंदविले होते. त्यामुळे विजयनेही अनेकदा चाहत्यांना आवाहन केले होते. मात्र, तरीही अनेक जण मुले आणि नवजात बाळांना घेऊन रॅलीत सहभागी झाले.                       

                        अपघातानंतर, गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला. विजय जखमींना भेटला नाही किंवा त्यांना सांत्वन दिले नाही, त्याऐवजी तो चार्टर्ड विमानाने थेट चेन्नईला गेला. तथापि, X वर लिहिले: “माझे हृदय तुटले आहे. मला प्रचंड वेदना आणि दुःख होत आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना मी शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.”

विजयच्या रॅलीत गर्दीची कारणे…

                        ६० फूट लांबीची प्रचार बस १०० फूट रुंदीच्या गर्दीच्या रस्त्यावर चालविल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दुसऱ्या मार्गाने जाण्याऐवजी, आयोजकांनी गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यामुळे दबाव वाढला आणि लोक पडू लागले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दबाव इतका तीव्र झाला की लोक, ज्यात मुले देखील होती, बेशुद्ध पडू लागली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
                         विजयने शांततेचे आवाहन करण्यासाठी आपले भाषण थांबवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांना मृतांपर्यंत लवकर पोहोचणे अशक्य झाले. करूरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता विजयविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार सर्वोच्च न्यायालयाचे वकील जीएस मणी यांनी दाखल केली आहे.

 

 

 

 

 

0
0

Leave a Reply

Realted News