♦ ब्लॅक बॉक्सचा सीव्हीआर आणि एफडीआरचा बारकाईने तपास
♦ सायबर हल्ल्यासह 2000 पैलूंवर तपास, तपास अहवाल येण्यास लागणार 3 महिने
अहमदाबाद : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला. विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो तपासासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे.
१२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबादेत झालेल्या विमान दुर्घटनेचा सायबर हल्ल्यासह २००० पैलू समोर ठेवून तपास केला जात आहे. खरे तर दुर्घटनेची अनेक कारणे वर्तवली जात आहेत. जसे की – दोन्ही इंजिन फेल होणे, फ्लॅपची चुकीची स्थिती, पायलटची चूक, सायबर हल्ला आदी. भारत, अमेरिका, ब्रिटनच्या ८ संस्था तपास करत आहेत. ते ब्लॅक बॉक्सचा सीव्हीआर आणि एफडीआरचा बारकाईने तपास करत आहेत. मात्र निष्कर्ष येण्यासाठी तीन महिने लागू शकतात.










Users Today : 1
Users Yesterday : 11