मोहपा शहराचा चुकीचा सिटी सर्वे रद्द,
नव्याने सिटी सर्वे होणार, तोही सरकारी खर्चानेच् ..!
का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद मोहपा येथे झालेल्या चुकीच्या सिटी सर्वेबाबत राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या सतत पाठपुराव्यामुळे आज बैठकीचे आयोजन केले होते. हि बैठक जिल्हा नियोजन भवनात पार पडली. सन 2017-18 मध्ये मोहपा नगर परिषदेचा सिटी सर्वे तालुका भूमीअभिलेख कार्यालय, कळमेश्वर यांच्याद्वारे झाला होता आणि तो 99 टक्के चुकीचा झाल्याची नागरिकांची ओरड होती. परिणामी मोहपा शहरातील बहुतांश नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.
या महत्त्वाच्या विषयासाठी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी पत्राद्वारे मोहपा शहरातील नागरिकांच्या मालकीच्या, वडिलोपार्जित, स्वमिळकतीच्या जमीनीलासुद्धा खरेदी-विक्रीसाठी अडचणी निर्माण होत होत्या. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेउन, हे सर्व मुद्दे आमदार डाॅ. देशमुख यांनी शासनाकडे लावून धरले. त्याची तात्काळ दखल घेत आज महसूल मंत्री ना. बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे झालेल्या बैठकीमध्ये जुना संपूर्ण सिटी सर्वे रद्द करून नवीन सिटी सर्वे करावा, असा आदेश दिला आहे.
![]()