February 7, 2026 8:42 am

इयत्ता १२ वी साठी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर संच

महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी द्वारे निर्मित इयत्ता १२ वी साठी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर संच

सराव पुस्तकाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते विमोचन

का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
काटोल : नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात काटोलवासीय नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. शेतीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील काटोलकरांनी नावलौकिकता प्राप्त केली आहे, असे गौरवोद्वार काटोल विधानसभेचे आमदार श्री चरण सिंग ठाकूर यांनी ‘राज्यशास्र प्रश्नोत्तर संच आणि सराव’ पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी काढले. यावेळी आ. ठाकूर यांचे हस्ते पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर निवेदिता राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यशास्र अकेडमी ची निंर्मिती असलेल्या तसेच डॉक्टर निवेदिता राऊत आणि डॉ पितांबर उरकुडे यांनी लिहिलेल्या इयत्ता बारावी करिता राज्यशास्त्र या विषयाचे ‘प्रश्नोत्तर संच आणि सराव’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते काटोल येथे झाले. यावेळी काटोल न. प. माजी उपाध्यक्ष मारोतराव बोरकर, समीर उमप, माजी प. सं. सभापती संदीप सरोदे, जगद्गुरु तुकाराम महाराज विचार मंच चे संस्थापक अशोक काळे, श्री साई नागरिक सहकारी पतसंस्थेचे सचिव प्रवीण लोहे, भूषण भोयर, आणि या पुस्तकाच्या लेखिका डॉ. निवेदिता राऊत आदी उपस्थित होते.
                       पुस्तकाची अनेक गुणवैशिष्ट्ये यावेळी आमदार चरणसिह ठाकूर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. या पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीलाच प्रकरणातील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत हे लिहून दाखवले आहे. सहसंबंध कसा स्पष्ट करावा, आपले मत कसे व्यक्त करावे, चूक की बरोबरची कारणे कशी लिहावीत, हे अगदी योग्य पद्धतीने मांडलेले आहे. प्रत्येक प्रकरणावर सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत.

                       प्रत्येक प्रकरणावर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. यासारखी अनेक गुणवैशिष्ट्य या पुस्तकात आहेत. इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्नोत्तर संच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल. यात बोर्ड परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रश्नाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याचा सराव करून विद्यार्थी एच एस सी बोर्ड परीक्षेत नक्कीच चांगले गुण प्राप्त करू शकतील. असा विश्वास या वेळी आ. ठाकूर यांनी व्यक्त केला
                       विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचा अधिक सराव करता यावा व इतर उपयुक्त माहितीचे विश्लेषण यात आहे. तसेच हे पुस्तक राज्यशास्त्राचे अभ्यासक, विश्लेषक, संशोधन संस्था, शिक्षण संस्था, शिक्षक, सामाजिक संस्था, सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी, आणि राज्यशास्त्र विभागात शिकवणारे, शिक्षण घेणारे या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. सदर पुस्तकाचा आधार घेत (प्रकाशनापूर्वी) न्यू इंग्लिश जुनियर कॉलेज मोहपा, जिल्हा नागपूर येथील कु. धनश्री खरबडे या विद्यार्थिनीला मार्च २०२५ च्या बोर्ड परीक्षेत राज्यशास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त झाले असून, जवळपास २९ विद्यार्थी, विद्यार्थिनींना या पुस्तकाचे वाचन करून बोर्ड परीक्षेत प्राविण्य प्राप्त झाल्याचे डॉक्टर निवेदिता राऊत यांनी पुस्तकाच्या उपयुक्ततेबद्दल सांगितले .
कु. धनश्री खरबडे ला मार्च २०२५ च्या बोर्ड परीक्षेत राज्यशास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त झाले
कु. धनश्री खरबडे ला मार्च २०२५ च्या बोर्ड परीक्षेत राज्यशास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त झाले
                      या प्रसंगी समीर उमप यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मला राऊत यांनी प्रास्ताविक केले. तर अशोक राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

 

0
0

Leave a Reply

Realted News