February 7, 2026 8:42 am

ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ बीडमध्ये महाएल्गार सभा

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सभा,

भुजबळ आणि हाके आक्रमक : जरांगेंना डिवचले

बीड : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा झाली. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

                         छगन भुजबळ म्हणाले, “अधिकाराच्या लढाईत निमंत्रण लागत नाही, जिथे हक्कांवर आघात होतो तिथे टकराव आवश्यक असतो.” सभेत गडबड घालण्याचा कट असल्याची माहिती त्यांनी दिली आणि अशा लोकांना तिथेच अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले.

                         लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत म्हटले, “एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्व आहे, केवळ गरीबी हटाव नव्हे.” त्यांनी सरकारचा जीआर दाखवत तो “ओबीसी आरक्षण संपवणारा”, आणि “सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा” असल्याचा आरोप केला.

                         ते पुढे म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावण्याचा प्रयत्न हा ओबीसींच्या हक्कांवर आक्रमण आहे. मागासवर्ग आयोग बंद करावा आणि न्यायालयाचे आदेश पाळावेत.” सभेत राज्यभरातील अनेक ओबीसी नेते उपस्थित होते, तर गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवणही हाके यांनी केली.

0
0

Leave a Reply

Realted News