February 7, 2026 7:10 am

ओबीसी आरक्षण वाचवा, हक्कांसाठी एकत्र या : सावनेरातून पंकज घाटोडे यांची हाक 

ओबीसी आरक्षण वाचवा, हक्कांसाठी एकत्र या! सावनेरातून पंकज घाटोडे यांची हाक

 काटा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
सावनेर : ओबीसींच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ नये आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे या उद्देशाने ओबीसी कम्युनिटी सावनेर वतीने उपविभागीय अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
                        या निवेदनामध्ये सध्या ओबीसी आरक्षणावर निर्माण झालेल्या संकटाचा ठळक उल्लेख करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा निर्णय झाल्यास, आधीपासूनच वंचित राहिलेल्या ओबीसी समाजाला मिळणाऱ्या शैक्षणिक व नोकरीच्या संधींवर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच, जर ओबीसी कॅटेगरीमध्ये आणखी नव्या जातींचा समावेश करण्यात आला, तर मूळ ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या वाट्याला येणाऱ्या हक्कांचे अतोनात नुकसान होईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.
                       या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोडे यांनी केले. पंकज घाटोडे यांनी सर्व OBC समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘‘ही लढाई कोण्या राजकीय पक्षाची नसून, ही आपल्या हक्काची, आपल्या अधिकाराची आणि आपल्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आपले अधिकारासाठी आवाज बुलंद करणे गरजेचे आहे.’’ असेही घाटोडे म्हणाले.

                       शासनाने निवेदनाची तात्काळ व गांभिर्याने दखल घेऊन ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेण्याची जोरदार मागणी ओबीसी कम्युनिटी, सावनेर च्या वतीने समाजिक कार्यकर्ते पंकज घाटोडे यांनी केले. यावेळीवेळी प्रकाश ढोबळे, जामवंत वारकरी, संजय टेंभेकर, संजय राऊत, गजु चैधरी, अरुण गुरव, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, योगेश राऊत, छत्रपती लांबट, दिनेश मछले, रवी वानखेडे, महेंद्र गोंढाणे, वैशाली जवंजाळ, अनामिका ढिमोले, रुई शेख, अन्सार शेख, कुणाल कोलते, बंडू चैरागडे, प्रमोद तिखे, गिरीश फळके, रमेश धनोले, वैष्णव ठाकूर, शुभम बन्सोड, शुभम साबळे, रितेश घोळसे, गौरव घोळसे, उमेश घोळसे, यश लाडे, किशोर महंत, गोलू इ. उपस्थित होते.

 

0
0

Leave a Reply

Realted News