February 7, 2026 8:38 am

कर्नाटकात स्लीपर बसला आग, 10 जिवंत जळाले

कर्नाटकात स्लीपर बसला आग, 10 जिवंत जळाले

30 हून अधिक प्रवासी होते

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे बुधवारी रात्री उशिरा स्लीपर बसला धडक बसल्यानंतर आग लागली. या अपघातात बसमधील 10 हून अधिक लोक जिवंत जळाले. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा आकडा 12 आणि 17 सांगितला जात आहे. हा अपघात NH‑48 वरील हिरियूर तालुक्यात झाला. बस बंगळूरुहून गोकर्णला जात होती. रिपोर्ट्सनुसार, बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते.

                        प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रात्री 2.30 वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या लॉरीने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या सीबर्ड ट्रान्सपोर्टच्या बसला धडक दिली. बसला तात्काळ आग लागली. त्यावेळी प्रवासी झोपलेले होते. यामुळे त्यांना स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली नाही.

 

0
0

Leave a Reply

Realted News