कळमेश्वरच्या नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात एचएससीत अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार

कळमेश्वर तालुक्यातून बारावीत प्रथम आलेली संस्कृती सिंह हिचा सत्कार करताना प्राचार्य पौर्णिमा मेश्राम.

विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक, वकृत्व, कला या स्पर्धांचे बक्षीस वाटप

का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर 
कळमेश्वरः येथील पीएमश्री नगरपरिषद उच्च माध्यमिक विद्यालयात वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचे तसेच वार्षिक निकालाचे आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन समारंभाचे आयोजन नुकतेच पार पडले. प्राथमिक शाळेतील नगरपरिषद प्रशासन अधिकारी अर्चना टालाटुले या अध्यक्षस्थानी होत्या.

                      प्रमुख उपस्थितीत प्राचार्या पौर्णिमा मेश्राम, नगरपरिषदेचे कर निरीक्षक होणमोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश सौदागर, उपाध्यक्ष पुसदकर, समिती सदस्य कडू, अंबडकर, नथ्थुजी घुमडे, पालक संघाचे उपाध्यक्ष बबन वानखेडे व सहसचिव शिवानी इंगोले, श्रीमती झळके, तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व शाळेचे माजी विद्यार्थी राकेश भोयर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक, वकृत्व कला या स्पर्धेचे बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.

                        वर्ग ५ ते ११ चा निकाल विभागप्रमुखांनी जाहीर केला. बारावीमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचेसत्कार करून कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कर्मचारी सोसायटीतर्फे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आनंदराव धरपाल स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान शाखेतून, तालुका व शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आले, तसेच सोसायटीचे रोख बक्षीस याप्रसंगी देण्यात आले.


प्रमुख मार्गदर्शक राकेश भोयर हे विद्यार्थ्यांना जीवनात स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विषद करतांना.

                        प्रमुख वक्ते राकेश भोयर यांनी विद्यार्थी जीवनात स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. यावेळी पर्यवक्षक राठोड, कर्मचारी सोसायटी सचिव मनीष निंबाळकर, सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती गमे, श्रीमती सोनकुसळे, श्रीमती जोध, क्रीडाप्रमुख खडसे, विभागप्रमुख नेरकर, श्रीमती अलोने, श्रीमती लांजेवार इ. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह पालक, विद्यार्थी मोठया सेख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सुरेखा धरपाल, प्रिया बोरकर, रोहिणी देशमुख, प्रीती बाळास्कर, मनीषा ठवली, माधुरी गेडाम, नंदा चैधरी, श्री. खैरे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य जांभरुणकर यांनी प्रास्ताविक, तर संचालन प्रीती जोघ व सुमन सिंग केले. आभार काळे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News