विदर्भ शिक्षक संघाची साप्ताहिक सभा सम्पन्न

पहलगाम येथे झालेल्या निरपराध 27 पर्यटकांच्या हत्याकांडाचा निषेध

का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर
नागपूर : काल गुरुवार ला विदर्भ शिक्षक संघाची साप्ताहिक सभा राष्ट्रभाषा प्रचार समिती कार्यालय, बर्डी, नागपूर येथे पार पडली.
विदर्भ शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजाराम शुक्ला यांचे अध्यक्षतेखाली व संस्थापक सरकार्यवाह के. जे. चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत सभेला सूरूवात होउन सर्वप्रथम 22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या निरपराध 27 पर्यटकांच्या हत्याकांडाचा निषेध करून मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेस सुरूवात होउन शासनाच्या नविन शैक्षणिक धोरण व उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली.
सभेला शहर कार्यकारिणी पदाधिकारी, प्रांतीय कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News