February 7, 2026 2:41 pm

कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात

कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात

काटा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : स्थानिक देशमुख ले आऊट वार्ड क्र. १० मधील श्री महाकाल मंदिराचे प्रांगणात लहानग्यांचा आनदांचा उत्सव असलेल्या भव्य ‘तान्हा पोळा’चे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाकाल मंडळाचे वतीने मोठ्या थाटात ‘तान्हा पोळ्या’चे आयोजन करण्यात आले होते.
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात
                       यावेळी उपस्थीत जवळपास पाचशे लहान मोठया सर्व बालकांनी तान्ह्या पोळयात आपला सहभाग नोदवला. बालकांसोबत त्यांचे पालकही मोठया उत्साहाने आपल्या श्रृंगार-सजविलेल्या लाकडी नंदीसह सहभागी झाले होते. सहभागी सर्वोत्कृष्ट नंदिना माजी न. प. उपाध्यक्ष ज्योत्सना सरजू मंडपे यांचे वतीने रोख बशीसांचे वाटप करण्यात आले.
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात
                        तर मंडळाच्या वतीने भेटवस्तूंसह खाऊंचे वाटप करण्यात आले. तान्हा पोळा उत्सवाच्या आयोजनासाठी मंडळाचे सदस्य जयंत अढाऊ, अजय डांगोरे, सूरेश गणोरकर, प्रशांत शेंडे, महेंद्र शेंडे, निलेश अढाऊ, मोहन सौदागर, सचीन गुप्ता, नारायण ठोंबरे, शंकर राऊत, सूरज धारपूरे, बालू सोनसरे, प्रशांत टाखळखेडे, निखील चांदूरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

0
0

Leave a Reply

Realted News