कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी
का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
कळमेश्वर : कळमेश्वरसह तालुक्यात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. काल सकाळी ७.३० वा. येथील जामा मस्जिद येथे मौलाना इस्राईल नूरी यांनी ईदुल अजहा यांची नमाज अदा केली.
यावेळी या नमाज पठण मध्ये ताजमोहम्मद बाबू, शेखजी शेख, नबीबाबा , बबलू शेख, अतावुला बाबा शेख, तुराब शेख सय्यद भाई, समीर भाई सेट, गुडु भाई, जसीम भाई, रशीद शेख, युनुस भाई, जावेद कय्यूम शेख, इरफान भाई, इकबाल मालाधारी, शेख जमीर, दिलदार शेख, अरमान शेख, अहमद कलाम, हासिम शेख, सबिरभाई शेख, जहीर सेट, रियाज भाई, नावेद शेख, समीर शेख, तालीब शेख, फिरोज पठान आदींसह मुस्लिम समाजातील सुमारे १२५ समाज बाधवांचा सहभाग होता.