कळमेश्वरच्या भगीरथ टेक्सटाईल मिलमध्ये शिबिर

रक्तदान शिबिर ही काळाची गरज : डॉ. राजीव पोतदार

कळमेश्वर : देशात रक्ताची आवश्यकता लक्षात घेता रक्तदान शिबिरासारखे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी केले. कळमेश्वर येथील भगीरथ टेक्सटाईल मिल आवारात शनिवारी (दि.7) भारतीय जनता कामगार महासंघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
                         याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, तालुकाध्यक्ष प्रमोद हत्ती, संघटनेचे कार्याध्यक्ष अड. मिलिंद देशपांडे, गजानन आवारी संजय चिचखेडे, उपाध्यक्ष तंत्रीपाल बारमाटे, गुणवंता पोटोडे, जनरल सेक्रेटरी शिशुपाल तुरकर, सुरेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. शिबिरात 31 जणांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधलकी जपली. साईनाथ ब्लड बँकच्या तज्ज्ञ चमूने रक्त संकलन केले.

                          यशस्वीतेसाठी सचिन रघुवंशी, माणिक आंबागडे, सुनील बागडे, शिवाजी जामगावकर, सुनील डाखरे, शेषराव अखंड, नरेंद्र शेंबलकर, ज्ञानेश्वर बोकडे, अरुण कडू, राजेंद्र मिलमिले, गोविंदा घुणे, कविता झोडे, गजानन काटोके, जयश्री राऊत, प्रमोद ढंगरे, तुळसा रेवतकर, रामेश्वर ढवळे, गोपिका पुरी यांच्यासह कामगार महासंघ कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.


खापा येथे 57 दात्यांचे रक्तदान

खापा :  शहर भाजप व खापा, केळवद मंडळातर्फे बैंक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात गुरुवारी (दि.5) सकाळी 10 वाजता रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी 57 जणांनी रक्तदान केले, शिवाय शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी आ. डॉ. आशिष देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वर्षा पोतदार उपस्थित होत्या. शिबिराचे उ‌द्घाटन नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या हस्ते पार पडले.
                        लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह नागपूरच्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. तर साईनाय ब्लड बँकेच्या चमूने रक्त संकलन केले. रक्तदात्यांना प्रोत्साहनपर हेल्मेट भेट देण्यात आले. यावेळी सतीश लांजेवार, लोकेश सुरकार, सतीश मारोतकर, प्रदीप बोरकर, मनोज शेंडे, भीमराव वरखडे, रविद्र डोंगरे, पियूष बुरडे उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News