“चिमुकलीचा विजेचा धक्क्याने मृत्यू, एकाच सप्ताहातील दुसरी घटना”
“सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी”
कळमेश्वर नगर परिषदेच्या बगीच्यातल्या घटनेचे तीव्र पडसाद
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणी
कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा बाबत कठोर कारवाहीसह,मुलीच्या कुटुबांस आर्थिक नुकसान भरपाई
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : काल गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी (दिनांक 6) सायंकाळी 7.45 दरम्यान कु. सोनाली संजय मरसकोल्हे (वय 12 वर्षे) हिचा नगर परिषदेच्या बगिच्यात खेळत असतांना हायमास लाईटच्या इलेक्ट्रिीक पोलच्या खूल्या वायरला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. मृत मुलीच्या मृतदेहाचे नागपूर मेडीकल येथे पोस्टमाॅर्टेम पश्चात आज दुपारी 3.00 वाजता कळमेश्वर न. प. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेचे तिव्र संतापजनक पडसाद जनमाणसात उमटले असून विविध पक्षांच्या नेते, कार्यकर्ते, सामाजीक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या तात्काळ निलंबणाची मागणीसह मृताच्या कुटुंबीयांना किमान 25 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. केली आहे.

कळमेश्वर नगर परिषदेच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराने त्रस्त नागरिकांच्या या दुदैवी घटनेवर प्रतिक्रिया…
इमेश्वर यावलकर I धनराज देवके I ॲड. विजय पवार I मनोज बढे I आशिष देषमुख I अनिल बोडखे I अजय मुंडवाइक I संजय धोंगडी I मंगेश गमे I ब्रिजलाल रघुवंशी
कळमेश्वर नगर परिषदेच्या बगीच्यात काल सायंकाळी सोनाली मरसकोल्हे या चिमुकलीचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. या दुदैवी घटनेत मृत सोनालीच्या आत्म्याला शांती, तसेच तीच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.
या अंत्यंत बेजबाबदार घटनेस जबाबदार अधिकारी व संबंधीत कर्मचाऱ्यांना विनाविलंब निलंबीत करून त्यांचेवर फौजदारी कायद्यांतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृताचे कुटुंबास यथासंभव आर्थिक मदत देण्याची मागणी कळमेश्वर तालुका समन्वय समितीचे सदस्य तथा मोहपा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष इमेश्वर यावलकर, कळमेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष धनराज देवके व ॲडवोकेट विजय पवार यांनी केली आहे.
चिमुकलीचा विजेचा धक्क्याने दुदैवी मृत्यूसाठी कळमेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी, संबंधीत विभागाचे कर्मचारी व्यक्तीशः व संघटीतपणे जबाबदार असल्याने, त्यांचेवर अक्षम्य हलगर्जीपणा बाबत कठोर कारवाहीसह मृत मुलीच्या कुटुबांस आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष धनराज देवके, आशिष देषमुख, अनिल बोडखे, अजय मुंडवाइक यांनी केली आहे.
काल सायंकाळी 12 वर्षीय सोनाली मरसकोल्हे या चिमुकलीचा विजेचा धक्क्याने दुदैवी मृत्यू झाला. या अंत्यंत बेजबाबदार घटनेस जबाबदार अधिकारी व संबंधीत कर्मचाऱ्यांवर फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृताचे कुटुंबास यथासंभव आर्थिक मदत देण्याची मागणी कळमेश्वरचे लोकप्रिय व संकटकाळी एका हाकेवर धावून जाणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे तसेच ब्रिजलाल रघुवंशी यांनी केली आहे.
स्थानिक व्यवसायी मनोज बढे यांनी या दुदैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत दोषीवर कठोर कारवाईसह, मृताच्या कुटुंबास शासनाने किमान 25 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषद हद्दीत अश्या विचित्र घटनांची श्रुंखलाच सूरू असून शहरातील सार्वजनीक ठिकाणे जशी प्राथ. शाळा, महाविद्यालये, बगीचे, बालोद्याने, खेळांच्या मैदानांची ही अवदशा आहे, तर भर लोकवस्तीतील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते, अंतर्गत रस्ते-नाल्या, भुमिगत व खुली गटारे, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालये, मटन मार्केट व आठवडी बाजाराची कल्पना न केलेलीच बरी. स्थानिक स्वराज्य संस्थेची ठरवून दिलेली निहीत कर्तव्ये पार न पाडण्याची शपथच् जणू मुनिसिपालटीच्या मुख्याधिकाऱ्यांसहीत सर्वच कर्मचाऱ्यांनी खाल्ल्याची चर्चा नागरिकांत आहे.

गेल्या चार वर्षापासून राज्यातील जवळपास सर्वच नगर परिषदा, नगर पंचायत, महानगरपालिका निवडणूकांअभावी निराधार असून पदाधिकाऱ्यांशिवाय पोरक्या असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. परिणामी नागरिकांना आपल्या मुलभूत सोयींसुविधांसाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलभूत लोकतांत्रीक प्रणालीला फाटा देत पदाधिकाऱ्यांच्या अभावाने कर्मचाऱ्यांवर वचकच् नसल्याने नागरिक मुलभूत सोयींसुविधांपासून वंचित आहेत.
