कळमेश्वर न. प .माध्यमिक विद्यालयाचा एसएससी चा निकाल ९९.९८

♦मयुरी खुशाल परांडे ही ९७% गुण प्राप्त करून प्रथम,
♦अथर्व देवेंद्र डेहनकर हा ९५.८०% गुण प्राप्त करून द्वितीय,
♦तर शर्वरी रवींद्र झुंजारकर हि ९२ % गुण घेवून तृतीय.

काटा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर
कळमेश्वर : कळमेश्वर येथील नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.९८ % लागलेला आहे. यामध्ये मयुरी खुशाल परांडे ही ९७ % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. ९५.८० % गुण प्राप्त करून अथर्व देवेंद्र डेहनकर हा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून, शर्वरी रवींद्र झुंजारकर हि ९२ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
                        यावर्षी शाळेमधून एकूण २४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे पूर्वा राजेंद्र वावरकर, खुशी भोजराज गमे, भावेश प्रभाकर कुंभारे, सुमित परमानंद वर्मा, सिमरम विनोद रघुसे, जान्हवी विजय तरवटकर, वंशिका रवींद्र बोराटे, दक्षता दादाराव लोणकर इत्यादी विद्यार्थी ९०  व ९० पेक्षा जास्त टक्केवारी घेवून उत्तीर्ण झाले आहेत.
                       उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पौर्णिमा मेश्राम, उपमुख्याध्यापक दादाराव जांभरुणकर पर्यवेक्षक बाबाराव राठोड ज्येष्ठ शिक्षक डॉ. मनीष निंबाळकर, निलेश बावनथडे, सुमित लंगडे, पंकज रामदे, शांता आलोने, मीना सोनकुसळे, किशोर साळवे, नंदा जांभळे, भागवत राहिले, मनोज काळे, सुरेखा धरपाळ, उज्वला गमे, सुमन सिंग, सेवाराम नेरकर आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News