पुरस्काराची 30 हजारांची रक्कम विठ्ठल – रुक्मिणी देवस्थानला देणार
नागपूर : ‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्यास त्याचे फळही चांगले, सुसंस्कारीत आणि विषमुक्त मिळते. त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावे व परसबागेत तयार झालेल्या विषमुक्त भाजांच्या माध्यमातून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रयोगशील शेती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी महिलांना केले.