महात्मा जोतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
सामाजिक समते करिता उल्लेखनिय योगदान
का टा वृत्तसेवा
नागपूर/ काटोल : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दर वर्षी महात्मा जोतिबा फुले जयंती व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केल्या जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर व संयुक्त जयंती समारोह मध्य रेल्वे, यांचे संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन परिसर काटोल, जिल्हा नागपूर येथे सामाजिक समता सप्ताहाचे निमित्ताने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने, राज्य विभागीय सदस्या विजयाताई श्रीखंडे यांनी केली. चळवळीचे गीतें निकी बोंदाडे, इंजी. गौतम पाटिल, चंद्रशेखर मेश्राम यांनी सादर केले. ‘फुले सावित्री नसती तर’ या गाण्यावर सुंदर डांस मंगला गाणार आणि माही मोहिले या जोडीने सादर केला. चमत्कार सादरीकरण राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा प्रधान सचिव डाॅ.प्रा. सुनील भगत, इंजि. गौतम पाटील, श्वेता पाटील यांनी केले. एकपात्री नाटक ‘मी रमाई बोलते’ शोभा पाटील यांनी सादर केले.
‘बाबाचा चमत्कार व महिलेवर बलात्कार’ हे नाटक आशुतोष टेंभुर्णे, अजय रहाटे, इंजी. कमलाकर सतदेवे, वर्षा सहारे, प्रिया गजभिये, वंदना टेंभुर्णे, चंदा मोटघरे यांनी सादर केले. तर ‘जोतिबा का संघर्ष’ हे सुप्रसिद्ध नाटक, जे महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रगती करिता जो त्याग आणि संघर्ष केला याची आठवण करून देते. असे संघर्षमय नाटक गौतम माघडे, वर्षा सहारे, अजय रहाटे, चंदा मोटघरे, आशुतोष टेंभुर्णे, चंद्रशेखर मेश्राम, इंजी. कमलाकर सतदेवे यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामभाऊ डोंगरे तर आभार प्रदर्शन इंजि.विद्यासागर पाटील यांनी केले. कार्यक्रमाला देवयानी भगत, वसंत मोहिले, इंदू मेश्राम, दीप्ती नाईक, वंदना सहारे, बाबाराव निश्वादे, साहेबराव गजभिये, स्वप्नील नाईक, जगलाल चैधरी, नीलेश पंडागरे, स्वप्नील नाईक, जितेंद्र, सचिन मेश्राम, बबलू जामगड़े, संजय चोपड़ा, हनुमान सहाय, रामहरी, दीपा पाटील, पल्लवी नाईक, लता गजभिए व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजापती नगर/ नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर, संयुक्त जयंती समारोह व प्रजापती नेहरू नगर सांस्कृतिक समिती ह्यांचे संयुक्त विद्यमाने प्रजापती नगर, मेट्रो स्टेशन, जेतवण बौद्ध विहार, जिल्हा नागपूर येथे सामाजिक समता सप्ताहाचे निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 15 एप्रिल ला कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने, इंदु ताई उमरे, दक्षिण विभाग, महा अनिस.कार्यकर्ता शोभा पाटील, सतीश उके सचिव , पूर्व विभाग यांनी केली व चळवळीचे गीतें अजय रहाटे, इंजी. गौतम पाटिल, कांचन उके, माया सुखदेवे, निशा मेश्राम यांनी सादर केले. “फुले सावित्री नसती तर ” या गाण्यावर मंगला गाणार आणि माही मोहिले या जोडीने नृत्य सादर केले. चमत्कार सादरीकरण राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष, इंजि. गौतम पाटील, श्वेता पाटीलयांनी यांनी चमत्कार सादरीकरण यांनी केले. एकपात्री नाटक “मी रमाई बोलते” शोभा पाटील यांनी सादर केले. “जोतिबा फुले का संघर्ष” हे संघर्षमय नाटक रॉकी घुटके, वर्षा सहारे, अजय रहाटे, चंदा मोटघरे, जगदीश पोटपुसे, इंजी.कमलाकर सतदेवे, श्वेता पाटील यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामभाऊ डोंगरे तर आभार प्रदर्शन जगदीश पोटपोसे यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय कांबळे, प्रशांत बोरकर, प्रणय मेश्राम, सम्यक, शुभम तिरपुडे, सुशांत सोनडवले, अजय गजभिये, निशांत, समर्थ, प्रशांत तायडे,आलोक रंगारी, अक्षय शेंडे, बंटी बोरकर ह्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला फुलन बाई खांडेकर, पंचफुलाताई बागडे, कामिनी पोटपोसे, कु. प्राची मेश्राम, इंदिरा ताई पाटील, वनिता रामटेके, देवयानी भगत, वसंत मोहिले, इंदू मेश्राम, वैशाली ताई कांबळे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.