February 7, 2026 4:03 pm

कु. जानवी लीलाधर बांबल 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम

बोरगाव (धुरखेडा) येथील गांधी विद्यालयाचा एसएससीचा निकाल 85.71 टक्के 

कळमेश्वर: तालुक्यातील बोरगाव (धुरखेडा) येथील गांधी विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 85.71 % लागला असून, तीन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  कु. जानवी लीलाधर बांबल 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे.
                         शाळेतून एकूण 14 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत व उर्वरित द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात कु. जानवी लीलाधर बांबल हिने 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला असून, 79 % गुण प्राप्त कु. भाग्यश्री भुसारी ही द्वितीय क्रमांकावर आहे. तर तृतीय क्रमांकावर कु. कृतिका बंडुजी गिर्हे हिने 78.80 % गुण प्राप्त केले आहे.
                        सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवप्रसादिक शिक्षण संस्थेचे सचिव संजय पाटील ठाकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना ठाकरे, शाळेतील शिक्षक विजय भांगे, गिरीधर झोटिंग, ममता भांगे, दिलीप घायवट, अविनाश चौधरी यांचे  हस्ते सत्कार करण्यात येवून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छांसह यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक  राजू भुसारी, अरुण अवझे, अरुण गुडधे, संजय गिर्हे, आशा डेहनकर इ. पालक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


0
0

Leave a Reply

Realted News