गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कारंजा (घाडगे) प्रतिनिधी :
दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दादाराव रामटेके, सचिव अजय भोकरे, कोषाध्यक्ष गोपाल पालीवाल, शेषराव वाघ, दुर्गाबाई इंगळे, नंदाताई धारपुरे, नर्मदा सरडे, पुंडलिकराव बोके, अजाबराव भोकरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर, कार्यवेक्षक वसंत बारंगे, वरिष्ठ शिक्षक लेखराम चोपडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राज्यगीत, झेंडा गीत व ‘वंदे मातरम्’ यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशिष मानकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समजावून सांगितली तसेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी वरिष्ठ शिक्षक लेखराम चोपडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा जोपासावा व प्रत्येक कार्य मनापासून व जबाबदारीने करावे, असे आवाहन केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी भारतातील थोर महिला व्यक्तिमत्त्वे—राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सोफिया कुरेशी, सिंधुताई सपकाळ आदींच्या भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगिता गुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
![]()
![]()
![]()