विजय वडेट्टीवार ‘किंगमेकर’,
11 पैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसचा विजय
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांत काँग्रेसने मोठे यश मिळवत 11 पैकी 7 नगरपरिषदांवर सत्ता मिळवली आहे. या विजयात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निर्णायक भूमिका असून ते या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
ब्रह्मपुरी नगरपरिषदेत काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 21 नगरसेवक निवडून आणले. यासह बल्लारपूर, मूल, नागभीड, घुग्गुस, वरोरा आणि राजुरा येथेही काँग्रेसने सत्ता मिळवत भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघांना धक्का दिला आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा निकाल भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधातील जनतेचा कौल आहे. येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेस अधिक ताकदीने उतरल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
![]()