February 7, 2026 3:04 pm

जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूमचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन‎

♦ यापुढे तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही…

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिक विविध विभागांच्या तक्रारी आणि निवेदनं सादर करतात. याचा पाठपुरावा गतीने होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना संपर्क क्रमांक, क्यूआर कोड आणि ऑनलाइन तक्रार करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्या ऑनलाइन पद्धतीने संबंधित विभागाला पाठवण्यात येतील. विहित मुदतीत या तक्रारी निकाली काढण्यासाठी कक्षातर्फे पाठपुरावा करण्यात येईल.
                        तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी ऑनलाइन सुविधा, तसेच ई-मेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर नागरिकांना याबाबत अभिप्राय नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. योग्य पद्धतीने तक्रारीचे निराकरण झाले नसल्यास ती तक्रार पुन्हा विचारात घेतील जाणार आहे. या पद्धतीमुळे नागरिकांच्या समस्यांची घरबसल्या सोडवणे शक्य होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
                          शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम आणि हॅलो कलेक्टर संवाद उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

0
0

Leave a Reply

Realted News