December 1, 2025 7:30 am

जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला

नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर,

दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेगाने तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण येत्या सोमवारी मंत्रालयात सोडत पद्धतीने काढले जाणार आहे. या सोडतीच्या वेळी मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी पत्रे देण्यात आली आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

                       राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
                       या आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबरला सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप आरक्षणावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून, 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

                        राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
                        या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे ही कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News