♦रोहितच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरे ICC जेतेपद
♦ चॅम्पियन भारतावर होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव, पराभूत न्यूझीलंडही मालामाल
क्रिडा विश्व : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य गाठले.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे ९ महिन्यांत दुसरे आयसीसी जेतेपद आहे. गेल्या वर्षी २९ जून रोजी त्याने टी-२० विश्वचषकही जिंकला होता.
रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत ७६ धावा केल्या. श्रेयस (४८ धावा), केएल राहुल (नाबाद ३४ धावा) आणि अक्षर पटेल (२९ धावा) यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने सलग दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (६३ धावा) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.