February 7, 2026 5:43 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पाईक — प्राचार्य डॉ. अलका थोडगे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पाईक — प्राचार्य डॉ. अलका थोडगे

मोहपा : बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (६ डिसेंबर) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय ठवळे, प्रा. सिद्धार्थ चाणकपुरे आणि डॉ. लीलाधर खरपूरीये उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर — अन्यायाविरुद्ध कडाडणारी तोफ : डॉ. ठवळे

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संजय ठवळे म्हणाले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्यायाविरुद्ध कडाडणारी तोफ. त्यांनी न्याय, सामाजिक समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. दलित, वंचित, स्त्रिया यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.”

ते पुढे म्हणाले की,
“संविधानाच्या तरतुदींमधून डॉ. आंबेडकरांनी उपेक्षित घटकांच्या सामाजिक उत्थानाचे मार्ग मोकळे केले. त्यांचे समता, सामाजिक न्यायाचे विचार अंगीकारून कार्य करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

इतर वक्त्यांचे मनोगत

प्रा. डॉ. लीलाधर खरपूरीये आणि प्रा. सिद्धार्थ चाणकपुरे यांनीही डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

 

प्राचार्य थोडगे : संविधानाने देश एकत्र आणला

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अलका थोडगे म्हणाल्या,
“भारत हा विविध जाती-धर्मांचा देश असून, त्यांना एकत्र बांधण्याचे मोठे कार्य डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले. पारंपरिक अन्यायपूर्ण प्रथा, अस्पृश्यता यांविरुद्ध त्यांनी लढा देत समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित केली. न्याय, कायदा, शिक्षण, बंधुता आणि सामाजिक समता या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.”

कार्यक्रमाची रूपरेषा

  • प्रास्ताविक : प्रा. डॉ. विनोद भालेराव

  • सूत्रसंचालन : प्रा. पवन उमक

  • आभार प्रदर्शन : प्रा. सचिन काळे

प्रा. अनिता गणोरकर, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. शुभम वाघ, कल्पना देवळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती रजनी गणोरकर, श्री. अजय अंजनकर, श्री. अरविंद दहाट आणि श्री. प्रकाश कोकोडे यांनी सहकार्य केले.

0
0

Leave a Reply

Realted News