तामिळनाडूचा दलितविरोधी चेहरा उघड
मानवाधिकार पायदळी तुडवले : प्रा. सी. लक्ष्मणन यांचा आरोप
नागपूर : तामिळनाडू शैक्षणिकदृष्ट्या प्रगत वाटले तरी वास्तवात दलितविरोधी असून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका चेन्नईतील एमआयडीएसचे माजी प्राध्यापक सी. लक्ष्मणन यांनी नागपुरात रिपब्लिकन फेडरेशनच्या चर्चेत केली.
त्यांनी सांगितले की, ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये तामिळनाडू देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, दलितांवर सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय अन्याय सातत्याने होत आहे. विषारी दारूच्या घटनांतही दलितच बळी पडतात. कामगार कायदे पायदळी तुडवले जात आहेत.
राज्य सरकार एसईझेडसाठी जमीन देते, पण गरिबांसाठी नाही. पोलीस, प्रशासन व न्यायव्यवस्था जातीय मानसिकतेतून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मागासवर्गीय मंत्रालय नसल्यामुळे निधी वितरणात अडचणी आहेत, तर दलितांवरील नोकरभरतीही थांबली आहे.
प्रा. लक्ष्मणन यांनी डीएमके सरकारवर संविधानविरोधी कारभाराचा आरोप करत, दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारून सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.












Users Today : 0
Users Yesterday : 11