February 7, 2026 5:54 pm

धापेवाडा येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन

बाल गणेश मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन

धापेवाडा : धापेवाडा येथे बाल गणेश मंडळाच्या वतीने बाजार चौकांत ( ता .२३) ला सायंकाळी 5 वाजता
तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तान्हा पोळ्याचे आयोजनाचे हे १५ वे वर्ष असून दरवर्षी नेमाने अविरत तान्ह्या पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यात ५०० च्या वर लहान मुलांनी सहभाग घेतला होता. यात लहान्यांसोवतच् त्यांच्या पालकांनीही हिरीरीने सहभाग घेतला.
नंदीबैल सजावट स्पर्धेत -प्रथम क्रमांक प्रथुल्या दाते, द्वितीय क्रमांक – अदिती बहादुरे, तृतीय क्रमांक – सार्थक पांढुर्णकर, चतुर्थ क्रमांक – रियांश पाटील, पाचवा क्रमांक – उर्वशी मस्के तर प्रोत्साहनपर बक्षिस सानवी बुरडे हिला देण्यात आले.

                         तसेच वेशभूषा सजावट गटात प्रथम क्रमांक-त्रिशा रोशन बरवड, द्वितीय क्रमांक – अर्थव पारसे, तृतीय क्रमांक – सानिध्य पावनकर, चतुर्थ क्रमांक- श्रध्दा सरदार, पाचवे क्रमांक-उत्कर्ष पाटील व प्रोत्साहनपर बक्षिस विपुल सावरकर यांस देण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प. स. माजी सभापती वैभव धोगे. ग्रा. पं. सरपंच मंगला शेटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धकाते, प्रकाश बिचवे , प्रकाश ठाकरे, बाल गणेश मंडळ अध्यक्ष कुणाल धार्मिक, उपाध्यक्ष राहुल रणदिवे, सचिव रवी बुरडे, सदस्य विजय बोकडे, विजय पाटील, विजय बरवड, दिपक बुरडे, कौस्तुभ दाढे, विलास बोकडे, किसन निखार याचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्सक्रमाचे संचालन शरद दाढे, तर आभार राजेंद्र बोकडे यांनी मानले.

 

0
0

Leave a Reply

Realted News