घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ५० रुपयांनी वाढ
नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नागपुरात ८ एप्रिलपासून ९०४.५० रुपयांत उपलब्ध होईल. दरवाढीची घोषणा पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ७ एप्रिलला दिल्लीत केली.
सध्या नागपुरात सिलिंडरची किंमत ८५४.५० रुपये आहे. सरकारने शेवटच्या वेळी ८ मार्च २०२४ रोजी महिलादिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. किमतीपेक्षा कमी किमतीत सिलिंडर विकल्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्र्यांनी सांगितले.