April 12, 2025 10:07 am

नागपुरात महिला वीज कर्मचाऱ्यावर हल्ला,

♦थकबाकीदारावर केला शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल 

नागपूर : नागपुरातील पाचपावली महेंद्र नगर येथे महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. मोहम्मद असद अब्दुल वाहाब कुरैशी या व्यक्तीविरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                      महावितरणच्या शारदा नगर शाखेतील मुख्य यंत्र चालक सत्यभामा कृष्णाजी वानखेडे या बाह्य स्त्रोत कर्मचारी धिरज वानखेडे यांच्यासह १२ हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कुरैशी यांच्या घरी गेल्या होत्या. या वेळी कुरैशी यांनी त्यांच्याशी वाद घातला.
                         घटनेची माहिती कार्यालयात देण्यासाठी जात असताना कुरैशी यांनी यशोदीप कॉलनी रोडवर त्यांची गाडी अडवली. त्यांनी धिरज यांची गच्ची पकडून मारहाण केली. सत्यभामा वानखेडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता कुरैशी यांनी त्यांचीही गच्ची पकडली. त्यांना अश्लील शिवीगाळ करून भिंतीवर ढकलले. त्यानंतर पुन्हा या भागात दिसल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तो पळून गेला.
                         सत्यभामा वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुरैशी विरुद्ध शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २२१, १३२, १२६(२), २९६, ३५१(३) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News