August 15, 2025 7:33 am

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य रक्षक : आ. डाॅ आशिष देशमुख

सावनेर : आज 22 जुलै 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, सावनेर येथे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘रोगनिदान व रक्तदान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

                         या ‘रोगनिदान व रक्तदान’ शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शेकडो लोकांनी आरोग्य तपासणी आणि रक्तदान केले. हिंगणा रोड, नागपूर येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या विविध विभागातील डाॅक्टरांच्या चमूने व ब्लड बँकेच्या चमूने शिबिरात सेवा उपलब्ध करून दिल्या. गरजूंना निःशुल्क औषधेसुद्धा वितरीत करण्यात आली.
                         यावेळी आ. डाॅ आशिष देशमुख यांनी ना. देवेन्द्र फडणवीस यांना सावनेर विधानसभा क्षेत्रातर्फे शुभेच्छा देताना गेल्या 10 वर्षात ना. फडणवीस महाराष्ट्राची सेवा करत असून व त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर असल्याचे म्हणाले. त्यांनी जनतेच्या आरोग्याची हमी घेत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरु केला असून मोठया आजारावर मुख्यमंत्री सहायता निधीमधून विशेष उपचार केला जातो. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाखो लोकांचे उपचार निःशुल्क होत असल्याचेही ते म्हणाले.
‘रोगनिदान व रक्तदान’ शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
‘रोगनिदान व रक्तदान’ शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
                         नागपूर येथे सावनेर रोडवर जिल्हा रुग्णालय सुरु होणार आसल्याचे तसेच पाटणसावंगी येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच सावनेर येथे 100 खाटांचे ट्रामा सेन्टर लवकरच सुरु होणार असल्याचेही ते म्हणाले. माझी माऊली फाउंडेशन व लता मंगेशकर हाॅस्पिटलद्वारे आरोग्यवाहिनी बस सेवेसारख्या अनेक उपक्रमांद्वारे आपण सावनेर विधानसभा क्षेत्रातील लोकांची काळजी घेत असल्याचेही ते म्हणाले.

                         यावेळी डाॅ. राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, तुषार उमाठे, स्वप्नील चैधरी, विजय देशमुख, महेश चकोले, संदीप उपाध्याय, अशोक तांदुळकर, देविदास मदनकर, दिलीप धोटे, मंदार मंगळे, दिगंबर सुरतकर, प्रमोद पिंपळे, अनंता पडाळ, राजू घुगल, पियुष बुरडे, विलास ठाकरे, प्रफुल मोहटे, पंकज भोंगाडे, मंगेश कोठाडे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) मनोहर कुंभारे यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News