काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात
नागपूर : दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये एवढा मोठा हल्ला करत असताना आपल्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? हजारो पर्यटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जात असताना त्यांची सुरक्षेची व्यवस्था का केली गेली नाही? असे कळीचे प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना उपस्थित केले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, 4-6 दहशतवादी येतात हल्या करत पर्यटकांना टार्गेट करत मारतात, आणि निघून जातात हे सर्व काही निंदनीय आहे. सरकारने ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे. यामागे जो कोणी असेल त्याला सोडू नये. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत.यावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ल्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून देशाची एकात्मता खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धर्मांना एकमेकांच्याविरोधात उभे करत भांडण लावण्याचा या सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.