देशभरात निषेध आंदोलन करणार : यशवंतसिंग ठाकुर
नागपुर: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांच्या मृत्यूनंतर नागपुरात विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. माणकापुर, नागपूर येथे आयोजीत राष्ट्रीय बजरंग बल च्या नागपूर शाखेतर्फे पहलगाम पर्यटक हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याशिवाय देशभरात निषेध आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय बजरंग बलचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतसिंग ठाकुर यांनी प्रसिद्यीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आतंकवादाचा कोणताही धर्म नसून, या भ्याड हल्ल्याचा सर्वच थरावरून निषेध करतांना राष्ट्रीय बजरंग बलच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाकिस्तान व आतंकवादाविरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांमध्ये आतंकवादाविरोधात मोठा रोष व्यक्त होत होता. यशवंतसिंग ठाकुर यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सर्व हिंदूंनी एकता, शस्त्र, शास्त्र, शक्ति, बल, शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी श्रीकांत दुर्गे, बब्बू ठाकुर, रविन्द्र मिश्रा, सचिन शर्मा, प्रतिक देशमुख, भारती ठाकुर, संजीवनी उरकुंडे, ममता सिंह, लता देशमुख, चैताली सप्रे, वंदना बंजारे इ. नी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या व आतंकवादाच्या समूह उच्चाटनासाठी सर्वाेपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रीय बजरंग बल चे कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()
![]()
2 Comments
इस्लामीक आतंकवादी का खात्मा हो
दुनिया का कोई भी मुस्लिम राष्ट्र वादी हों नहीं सकता है। शांति के लिए इसे नष्ट करना ही होगा वरना दुनिया में कोई मानव सुरक्षित नहीं होंगा।।