August 15, 2025 11:10 am

पहलगाम हल्ल्याचा नागपुरात निषेध, विविध संघटनांचे आंदोलन

विहिंप, उबाठासह विविध संघटनांचे आंदोलन; राष्ट्रवादीचा कॅंडल मार्च

नागपूर : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांच्या मृत्यूनंतर नागपुरात विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषद (विहिंप) २५ एप्रिलला देशभरात निषेध आंदोलन करणार आहे.
                          नागपुरात विहिंप, उबाठा, आंतरराष्ट्रीय विहिंप, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि लद्दाख, जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राच्या नागपूर शाखेने आंदोलने केली. शिंदे सेनेने जिल्हाप्रमुख सुरज मोहन गोजे यांच्या नेतृत्वात गांधी पुतळा चितारओळ येथे निषेध नोंदवला.
                          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने संविधान चौकात कॅंडल मार्च काढला. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाने सक्करदरा चौकात धरणे आंदोलन केले.
                           विहिंपच्या मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क विभागाने २५ एप्रिलला सर्व मंदिरांमध्ये निषेध व श्रद्धांजली सभेचे आवाहन केले आहे. विहिंपचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे आणि क्षेत्र संपर्कप्रमुख अनिल सांबरे यांनी मंदिरांमध्ये आरती आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News