मोहपा नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या
इमारतीचा ‘लोकार्पण सोहळा’ आज
का टा वृत्तसेवा
मोहपा : नगर परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोहपा येथे ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचे हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डाॅ. आशिष देशमुख, विधानसभा सदस्य हे असतील.
तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये आ. कृपाल तुमाने, विधान परिषद सदस्य यांचेसह डाॅ. राजीव पोतदार माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती ना. जि., रमेश मानकर माजी अध्यक्ष, जि. प. नागपूर, अशोक धोटे माजी अध्यक्ष जि. प. नागपूर, मनोहर कुंभारे अध्यक्ष, भाजपा ना. जि. ग्रा, ॲड. प्रकाश टेकाडे माजी सभापती, पं. स. कळमेश्वर, बापुसाहेब हळदे माजी सदस्य, न. प. मोहपा, मिना तायवाडे, माजी सभापती, पं. स. कळमेश्वर, अजय वाटकर, अध्यक्ष, संजय गांधी निराधार अ. समिती, कळमेश्वर, दिलीप धोटे, माजी अध्यक्ष, भाजपा तालुका कळमेश्वर, इमेश्वर यावलकर माजी अध्यक्ष, न. प. मोहपा, मंगेश चोरे, महामंत्री भा.ज.पा. कळमेश्वर तालुका, संदीप उपाध्ये, माजी अध्यक्ष, प्रमोद हत्ती, अध्यक्ष व मनोज मांडवगडे, महामंत्री भाजपा कळमेश्वर तालुका, इ. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तरी उपरोक्त कार्यक्रमास आज दि. ३१ मे २०२५ रोजी, सायं. ०६.३० वाजता नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोहपा येथे आयोजीत कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक इमेश्वर यावलकर माजी अध्यक्ष, न. प. मोहपा, विलास गणोरकर, अध्यक्ष, निलेश काऊटकर महामंत्री व भिमराव बोंदरे महामंत्री, भाजपा मोहपा शहर यांनी केले आहे.
![]()
![]()
![]()