August 15, 2025 7:31 am

बोरगावच्या गांधी विद्यालयात Tree Plantation Drive

JSW आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांचा संयुक्त उपक्रम

काटा वृत्तसेवा I
कळमेश्वर : तालुक्यातील गांधी विद्यालय, बोरगाव येथे JSW Aspire आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने Tree Plantation Drive हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. दिनांक 8 ऑगस्ट 2025 (शुक्रवाऱ) ला JSW Aspire समूहाने आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सर्व भागधारकांना एकत्रित आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
JSW आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांचा संयुक्त उपक्रम
JSW आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांचा संयुक्त उपक्रम
                         या कार्यक्रमा प्रसंगी JSW CSR Head प्रणव पाटील, शिव प्रासादिक संस्थेचे सचिव संजय ठाकरे तसेच महादेव वानखेडे, सरपंच, बोरगाव, रंजना ठाकरे, मुख्याध्यापिका, गांधी विद्यालय बोरगाव, मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशनचे DPM प्रशांत लोखंडे, राहुल, तालुका समन्व्यक, हर्षवर्धन भांडारकर (शैक्षणिक शिक्षक), नरेश करकाडे (वरिष्ठ जीवन कौशल्य शिक्षक), आनंद चव्हाण (पर्यावरण शिक्षक), विजय भांगे, अविनाश चौधरी, गिरीधरजी झोटिंग, दिलीप घायवट, ममता भांगे, हरबडे, पोराटे इ. शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका रेखा भुसारी, आशा वर्कर सुनीता नखाते, सुवर्णा गिर्हे (SMC उपाध्यक्ष) यासह गावातील पालकवर्ग व नागरिक उपस्थित होते.
                       JSW चे प्रणव पाटील, प्रशांत लोखंडे, रंजना ठाकरे, विजय भांगे यांनी पर्यावरणाच्या संतुलनात वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचे महत्व यावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्थानिकांसह सर्वांनी या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसादासह शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News