बोरगाव सरपंच पदी श्रीराम धोटे पुनश्च आरुढ होणार?

माजी सरपंच श्रीराम धोटे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा

का टा वृत्तसेवा : आशिष देशमुख
कळमेश्वर:  कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील काँग्रेसचे सरपंच श्रीराम धोटे यांचेवर राजकिय व्देषापोटी विरोधकांनी जबरदस्तीने शासकिय जागेवर अतिक्रमणाचे खोटे आरोप लावले होते. राजकिय विरोधक उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांवर दडपण आणून श्रीराम धोटे यांना निष्काशीत केले होते. विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेशाला श्रीराम धोटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यांतील शासकिय जागेवर अतिक्रमणाचे सर्व अहवाल दुर्लक्षित करून दिलेल्या या निर्णयावर मा. उच्च न्यायालयाने चांगलेच् ताशेरे ओढत याचिकाकर्ते माजी सरपंच श्रीराम धोटे यांना दिलासा दिला आहे.
                      दिनांक ९ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे आदेश व अहवालाची न्यायिक शहानिशा करून श्रीराम धोटे यांचे सरपंच पद कायम ठेवत व विभागिय आयुक्त, नागपूर यांचा आदेश रद्द केला आहे. प्रतिवादी क्र. 1 विभागिय आयुक्त, नागपूर यांनी 15/4/2025 रोजी दिलेला निर्णय व प्रतिवादी क्र. 2 जिल्हाधिकारी, नागपूर यांनी 3/3/2025 रोजी दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने पुर्णतः रद्द केला असून सदर प्रकरण पुन्हा यांतील प्रतिवादी क्र. 2 जिल्हाधिकाऱ्यांकडे कायद्याप्रमाणे व आदेशात नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार विचारार्थ परत पाठविण्याचा आदेश दिला आहे.
                      आदेशात सरपंच श्रीराम धोटे यांनी जिल्हाधिकारी, नागपूर यांचे समक्ष 30/5/2025 रोजी हजर व्हावे, असेही म्हटले आहे. प्रकरण पुनश्च जिल्हाधिकारी नागपूर यांचेकडे पाठवण्यासोबतच् सर्वच प्रतीवादींवर मा. उच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. परिणामी श्रीराम धोटे बोरगावचे सरपंचपदी पुनश्च आरुढ होणार असल्याने व त्यांच्या न्यायालयीन विजयाबद्धल माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलतांना सुनिल केदार म्हणाले, ‘‘निव्वळ राजकिय विरोधापोटी अत्यंत खालच्या पातळीवर जावून लोकप्रतिनिधींना लोकसेवेपांसून परावृत्त करणाऱ्यांना येणार्या काळात जनता त्यांची जागा दाखवणार’’.
खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष बाबाराव कोढे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे माजी संचालक किशोर मोहोड, खरेदी विक्री समिती उपाध्यक्ष आशिष देशमुख, राजेन्द्र सूके, विजय गिरी, अण्णाजी चव्हाण, अनिल टेकाडे, प्रकाश शेटे, रवींद्र ठाकरे, मोरेश्वर वानखेडे, धर्मेंद्र बागडे इ. नी श्रीराम धोटे यांचे अभिनंदन केले. श्रीराम धोटे यांनीही सगळ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News