February 7, 2026 2:50 pm

”बौद्धिक गुलामगिरीचं निवारण हेंच खरं स्वातंत्र्य”

बौद्धिक गुलामगिरीचं निवारण,

हेंच खरं स्वातंत्र्य 

                         प्रियं बंधूंनो ! भारताच्या सर्व रोगांचं मूळ प्रामुख्यानं त्याचं अज्ञान आहे ! वर्षानुवर्ष त्यांची बुद्धी मुर्दाड व भ्रमिष्ट बनवण्यांत आली आहे, धर्म, पंथ, जाति, वर्ण, संप्रदाय-रुढ्या चमत्कार, देवावतार, स्वर्ग, पुण्यकर्म इत्यादी अनेक नावांनी भल-भलत्याच गोष्टीचं किटन त्यांच्या बुद्धीवर चढवलं गेलं असून खऱ्या तात्त्विकतेपासून त्याला दूर ठेवण्यात आलं आहे ! उठणं, बसणं बोलणं, इत्यादि सामान्य व्यवहारांचं देखील यथार्थ स्वरूप बहुजनसमाजास कळेनासं झालं, इतका त्याचा अध:पात झाला आहे !

                         अशा अंधकारमय परिस्थितींत प्रकाशाचीं ज्योत घराघरांतून पेटवण्याचं कार्य प्रत्येक विचारी माणसानं आज केलं पाहिजे; तरच जनतेचं अंतरंग बदलेल व तिला स्वावातंत्र्याचा खरा उपभोग घेतां येईल. आपला कल्याणमार्ग व आपला कल्याणकर्ता कोण, हें जोंवर जनतेला स्वतःच्या दृष्टीने पारखतां येणार नाही तोपर्यंत तिला कोणतंहि स्वातंत्र्य व काहीहि अधिकार दिले, तरी दूर्दशेच्या चक्रव्यूहांतून बाहेर पडतां येणे शक्य नाही. अशा स्थितींत ब्रह्मज्ञानाच्या जाड गोष्टी लोकांना शिकवीत बसावं हा शुद्ध वेडेपणा असून, लोकांपासून जाणत्यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं स्वार्थ साधावा यापेक्षा दुसरं पतन नाही !


राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित
सर्दभ ग्रंथ : युगप्रभात
संकलन : विजय नागपूरे, कळमेश्वर

0
0

Leave a Reply

Realted News