December 1, 2025 7:30 am

ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार : नितीन गडकरीं

जात नव्हे, कर्तृत्व मोठे करते; नितीन गडकरींचे विधान

का टा वृत्तसेवा I
नागपूर : राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे ते म्हणाले. माणूस हा जातीमुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे मोठा होतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

                         मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी ब्राह्मण आहे, पण मला जात-पात मान्य नाही. माणूस जात, धर्म किंवा लिंगावरून नव्हे, तर त्याच्या गुणांवरून आणि कर्तृत्वावरून मोठा होतो. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्राह्मण समुदायाचा उल्लेख करत सांगितले की, तिथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा आदी ब्राह्मण प्रभावी आहेत, तर महाराष्ट्रात त्यांना फारसे महत्त्व मिळालेले नाही.

धापेवाडा येथे ‘धापेवाडा टेक्सटाईल’ नावाचा कारखाना सुरू होणार

उद्घाटनासाठी ‘हिरोईन हेमा मालिनी’ला धापेवाड्याची साडी घालण्याची गडकरींची विनंती

                         नितीन गडकरी यांनी यावेळी हलबा समाजासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. हा समाज हातमाग आणि पॉवरलूम च्या साड्यांसाठी प्रसिद्ध होता. ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे ‘धापेवाडा टेक्सटाईल’ नावाचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. येथे तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंडमध्ये प्रिंटिंग केले जात असून, त्यांची मागणी वाढली आहे. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
File Photo
File Photo
                        तसेच, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना बोलावण्यात आले असून, त्यांनी धापेवाडा येथे तयार झालेली साडी परिधान करून येण्याची विनंती मान्य केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. हेमा मालिनी या साड्या परिधान करून आल्यास या साड्यांचे मार्केटिंग आपोआप होईल. बाजारात दोन ते तीन हजार रुपयांना मिळणाऱ्या या साड्या गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ 400 रुपयांना उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे विदर्भाला सुती हातमाग आणि पॉवरलूम साड्यांची ओळख परत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News