भारताची अखंडता कायम राखण्यास सरदार पटेल यांची महत्त्वाची भूमिका – डॉ. संजय ठवळे
काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर
कळमेश्वर : बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे दि- 23 सप्टें- रोजी राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या एकता व अखंडता या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय ठवळे व अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे उपस्थित होत्या
डॉ. संजय ठवळे यांनी मार्गदर्शन करत असताना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला एकत्र आणण्यात सरदार वल्लभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांनी 565 संस्थाने भारतात विलीन करून घेतली. काश्मीर, जुनागढ, हैदराबाद ही संस्थाने विलीन करून घेण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे, तसेच सरदार पटेल यांनी भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी मोठे योगदान दिले, त्यांच्या कणखर भूमिकेमुळेच भारताची अखंडता आज कायम आहे. असे विचार डॉ. ठवळे यांनी मांडले
कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांनी सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. डॉ.प्रमोद वडते, प्रा. डॉ. अजित जाचक, ग्रंथपाल डॉ. धनंजय देवते प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सचिन काळे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. पवन उमक, प्रा. शुभम वाघ सह सौ. कल्पना देवळे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विनोद भालेराव तर आभार डॉ. लीलाधर खरपुरिये यांनी मानले. अजय अंजनकर रजनी गणोरकर प्रदीप बगडे श्री प्रकाश कोकोडे यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.