अक्षर पटेल 29 धावा काढून बाद
स्पोर्ट्स : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यासाठी ९१ धावांची आवश्यकता आहे. दुबईमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २५१ धावा केल्या. ३५ षटकांत ३ गडी गमावून भारताने १६१ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल मैदानावर आहेत.
कर्णधार रोहित शर्माने ७६ आणि शुभमन गिलने ३१ धावा केल्या. दोघांमध्ये १०५ धावांची भागीदारीही झाली. विराट कोहलीला फक्त १ धाव करता आली. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर, रचिन रवींद्र आणि मायकेल ब्रेसवेल यांनी १-१ विकेट घेतल्या.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड: मिशेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि विल्यम ओरूर्क.