April 12, 2025 10:07 am

मंत्री थर्ड डिग्रीची भाषा करत असेल तर महाराष्ट्रात तालिबानी राज्य : संजय राऊत

हिंदू राष्ट्र म्हणणारे इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देताय, गद्दारांना तशीच शिक्षा – संजय राऊत

मुंबई : एखादा मंत्री जर थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रात तालिबानी राज्य आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणत आहात आणि इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देत आहात, मग तसे असेल तर इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना कोणती शिक्षा देता माहिती आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला आहे.
                        संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना काय शिक्षा दिली जाते , हे पाहायचे असेल तर इराणमध्ये जा आणि बघा. तिथे गद्दाराला भर चौकात उघडे करत पार्श्वभागावर 100 फटके मारले जातात आणि मग फासावर लटकवतात. तुम्ही कुणालला तशी शिक्षा देणार असाल तर तशीच तुमच्या मंत्र्यांना मान्य आहे का? तसा एखादा प्रस्ताव आणू.

बावनकुळेंच्या बेडरुममध्ये औरंगजेबाचा फोटो- संजय राऊत

                         संजय राऊत म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना मदत केली, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्यावर टीका केली. हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते. त्याच्या बेडरुममध्ये औरंगजेबाचा फोटो असेल कारण त्यांना औरंगजेब निवडणूक जिंकून देतो. याच्या घरी अफजलखान, औरंगजेब यांचे फोटो असणारच.

फडणवीसांनी अनेकदा टीका सहन केली

                          संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर अनेकदा टीका झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक चुकीची वक्तव्य केली गेली पण त्यांनी ती सहन केली. तुम्ही त्याला शब्दाने किंवा कायद्याने त्याला विरोध करू शकतात. कायद्याचे राज्य जर टिकवायचे असेल तर अभिव्यक्ती स्वतंत्र जपले पाहिजे.

सालियानच्या वडीलांनी राजकारण करू नये

                          दिशा सालियान हिच्या वडीलांनी मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नये. तिचे वडील असे का वागत आहे, त्यांनाच माहिती पण आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिशा सालियान प्रकरणी सत्य पहिलेच समोर आले आहे. काय झाले हे पूर्वीच् समोर आले आहे. दिशाच्या वडीलासंच्या आडून काही राजकीय लोकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला लक्षात यायला हवे.

तर यांना चापकाने फोडले असते

                   संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुबियांवर चिखलफेक करणारे काही लोकं आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना असे राजकारण करताना लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुष आहेत, त्यांचा फोटो कुणीही वापरू शकते. शिंदेदेखील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरतात. पण बाळासाहेब जर असते तर त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चापकाने फोडले असते.
ही सत्तेची मस्ती
                       संजय राऊत म्हणाले की, सत्तेतील लोकं म्हणतात कुणाल कामराला टायरमध्ये टाकून मारले पाहिजे. द्या ना थर्ड डिग्री, चांगली गोष्ट आहे. पाहूना तोपर्यंत कुणाची सत्ता राहते. तुम्हाला दुखावणारे वक्तव्य जर कुणी केले असेल तर त्यासाठी देशात कायदा आहे, हे असे वक्तव्य म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News