August 15, 2025 9:54 am

मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार

                        मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे सायंकाळी होणार आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे यांची सभा सुरू होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीचा मनसेचा मेळावा हा कायमच चर्चेत असतो. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या सभेत महत्त्वाचे भाष्य करण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम णाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा वाद, महायुती सरकारचा कारभार यावरही काय भाष्य करणार याकडे लक्ष आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

राज ठाकरेंच्या भाषणसाठी शिवाजी पार्कवर जमलेली गर्दी

राज ठाकरेंना ऐकण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित

                        मनसे नेते अविधाश जाधव, अविनाश अभ्यंकर यांसह माजी आमदार राजू पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांचा समावेश आहे.

मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी

                         महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असून मैदानात चार मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. पाण्याचे टँकर्स, पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाइल टॉयलेट, रुग्णवाहिका, फायर इंजिन असणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शुश्रूषा, हिंदुजा हॉस्पिटल येथे आपत्कालीन खाटा आरक्षित करून ठेवल्या आहेत. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News