September 10, 2025 5:25 am

मनोज जरांगेनी उपोषण सोडले : गावाकडे निघण्याची घोषणा

हैदराबाद गॅझेटियर लागू होणार, सरकारचा GR जरांगेंनी स्वीकारला

मुंबई : मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.

जरांगेंच्या डोक्यावर पडला विजयाचा गुलाल

                       मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना लिंबू सरबत पाजले. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मराठा बांधवांनी व्यासपीठावर जरांगेंवर विजयाचा गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला.

                        सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी फटाकेही फोडले जात आहेत. आझाद मैदानासह मुंबईत विविध ठिकाणी हे चित्र आहे. दरम्यान, जीआरमध्ये शासकीय भाषा असते. त्यामुळे मनोज जरांगे यांचे वकील त्यांना सरकारच्या जीआरमधील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News